पिंपरी ः पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. पण, त्यांना काही दिवस होम क्वारंटाईन रहावे लागणार आहे. होम क्वारंटाईननंतर पुन्हा एकदा 24 तास जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असेल, असे कलाटे यांनी सांगितले.
राहुल कलाटे यांना 6 जुलै रोजी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांनी सहा दिवस रुग्णालयात उपचार घेतले. आता त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबत शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी फेसबुकवर पोस्ट करुन माहिती दिली आहे.
शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना ‘डिस्चार्ज’










Leave a Reply