Dehu news: श्रीराम मंदिरासाठी आदर्श उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे यांच्यातर्फे एक लाखाचा निधी

 

Dehu news: श्रीराम मंदिरासाठी आदर्श उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे यांच्यातर्फे एक लाखाचा निधी

देहूगावातून पहिला निधी सुपूर्द

Pckhabar- अयोध्या येथे भव्यदिव्य असे श्रीराम मंदिर उभारण्यात येत आहे. या मंदिरासाठी देहूगाव ग्रामपंचायतचे आदर्श उपसरपंच आणि श्रीराम भक्त स्वप्नील आप्पा काळोखे यांनी एक लाखांचा निधी श्रीराम मंदिर उभारण्यासाठी दिला आहे. तसेच राममंदिराचे कार्य पुर्ण झाल्यावर देहूतील 101 रामभक्तांना रामजन्मभूमीत स्वतःच्या खर्चाने श्रीरामाचे दर्शन घडवून आणण्याचा संकल्प केला.

यावेळी विश्वहिंदू परिषदचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख श्रीरंग राजे, पंढरपूर देवस्थान समिती विश्वस्त ह. भ. प. शिवाजी महाराज मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

अयोध्या येथे भव्यदिव्य असे श्रीराम मंदिर उभारण्यात येत आहे. देशभरातून रामभक्त सढळ हाताने निधी देत आहेत.
देहूगावातून प्रथम आदर्श उपसरपंच स्वप्नील आप्पा काळोखे यांनी एक लाख रुपयांचा निधी राम मंदिर निर्माण कार्यासाठी दिला आहे. याबद्दल काळोखे यांचे विश्वहिंदू परिषदचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख श्रीरंग राजे यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे. धार्मिक कार्याबाबतचा त्यांचा आदर्श अन्य नागरिकांनी घ्यावा, असे राजे म्हणाले.

याबाबत आदर्श उपसरपंच आणि श्रीराम भक्त स्वप्नील आप्पा काळोखे म्हणाले ” अनेक वर्षांपासून रखडलेले श्रीराम मंदिर उभारण्याचे काम मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे. देशभरातून मंदिर उभारण्यासाठी निधी दिला जात आहे”. या पवित्र कार्याला आपलाही वाटा असावा या उद्देशाने देहूगावातून प्रथमच आपण एक लाखांचा निधी दिल्याचे त्यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *