Dehu news: कर्तव्य फाउंडेशन आयोजित रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Dehu news: कर्तव्य फाउंडेशन आयोजित रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Pckhabar- कर्तव्य फाउंडेशन देहू यांच्या वतीने स्व. अक्षय अगरवाल यांच्या जन्मदिनाच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 180 मुली व महिलांनी सहभाग घेतला.

देहूगाव येथे आयोजित केलेली ही स्पर्धा खुला गट, मोठा गट आणि लहान गट या तीन गटात पार पडली. तिन्ही गटांतून पाच उत्कृष्ट रांगोळी काढणाऱ्या मुली आणि महिलांना प्रमुख पाहुणे सतिश अग्रवाल, बाळासाहेब शिवले, कुटे सर यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी कर्तव्य फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.

लहान गटातील विजेते पुढीलप्रमाणे:
1) पुर्वा दत्तात्रय काळोखे
2) अभिलाषा मोहन वाघमारे
3) श्रेया विवेक काळोखे
4) सिद्धी अजित निकम
5) जान्हवी सुमल शिंदे

मोठा गटातील विजेते पुढीलप्रमाणे:
1) दिव्या लहू गुंड
2) दिक्षा मारूती वाळुंज
3) शितल मजांबा डिसले
4) दिक्षा मिलिंद गायकवाड
5) ज्ञानेश्वरी झेंडे

खुला गटातील विजेते पुढीलप्रमाणे:
1) नेहा केशव काळोखे
2) शितल प्रविण पिंजन
3) रेखा दत्तात्रय पवार
4) साक्षी प्रकाश भुजबळ
5) अवंती रणजित चौगले

या सर्व विजेत्या स्पर्धकांनी उत्कृष्ट रांगोळी काढत विविध सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *