कामशेतच्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: शैलाताई खंडागळे

 

कामशेतच्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: शैलाताई खंडागळे
Pckhabar- कामशेतच्या सर्वागीण विकासासाठी कामशेतकरांनी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन पुणे जिल्हा परिषद सदस्य शैला खंडागळे यांनी केले.

कामशेत ग्रामपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या बैठकीत खंडागळे बोलत होत्या. याप्रसंगी सर्व उमेदवार व त्यांचे समर्थक उपस्थित होते.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे. आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे, असेही शैलाताई खंडागळे म्हणाल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *