Talegaon Dabhade news: उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांचा राजीनामा


Talegaon Dabhade news: उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांचा राजीनामा

Pckhabar-तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली प्रमोद दाभाडे यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्याकडे सुपूर्द केला असून नगराध्यक्षांनी तो मंजूर केला आहे.

यावेळी माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे, हेमलता खळदे, मंगल भेगडे, संगीता शेळके, नगरसेवक अरुण माने, रोहित लांघे उपस्थित होते.

दाभाडे यांनी  7 फेब्रुवारी 2020 मध्ये उपनगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला होता. त्या प्रभाग क्रमांक 9 मधून तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीकडून निवडून आल्या आहेत. त्यांनी पाणीपुरवठा समितीचे सभापती पदही भुषविले आहे. त्यांनी या अगोदर गेली चार वर्षांमध्ये विविध समित्यांवर सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांनी आपल्या कामांमधून शहर विकासाचा ठसा उमटवला आहे. दाभाडे यांनी इतर सदस्यांना उपनगराध्यक्ष पदावर काम करण्याची सदस्य संधी मिळावी, म्हणून राजीनामा दिला असल्याचे सांगितले.

दरम्यान, यावर्षीच्या अखेर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे शेवटच्या वर्षी कोणाला उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *