Maval Gram Panchayat Election News: १५१ मतदान केंद्रावरील मतदान यंत्र सील

Maval Gram Panchayat Election
News: १५१ मतदान केंद्रावरील मतदान यंत्र सील
 Pckhabar- मावळ तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या १५१ मतदान केंद्रावरील मतदान यंत्राचे सील करण्याची प्रक्रिया पै.विश्वनाथराव भेगडे क्रीडा संकुलमध्ये सोमवारी पार पडली. यावेळी मतदानासाठीच्या २०० मतदान यंत्रांना सील करण्यात आल्याची माहिती निवडणूक नियंत्रण अधिकारी, मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.

मावळ तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या १५१ मतदान केंद्रासाठी १५१ मशीन तसेच ४९ राखीव मशीन यावेळी सील करण्यात आल्या. यासाठी ३४ टेबलाचे नियोजन करण्यात आले होते. या प्रत्येक टेबलावर १ निवडणूक अधिकारी, सहाय्यक अधिकारी, कर्मचारी तसेच उमेदवार किंवा त्यांचा प्रतिनिधी उपस्थित होते.

ग्रामपंचायतीच्या निवडणुका  दि. १५ जानेवारी रोजी होत आहे. त्यासाठीची सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली.  

दरम्यान, मावळ तालुक्यातील ग्रामपंचायती अस्तित्वास आल्यापासून निवडणुकीतील मतमोजणी प्रथमच तळेगाव दाभाडे येथे होत आहे. यामुळे ग्रामीण भागातील निकालाचा जल्लोष तळेगावकरांना अनुभवायला मिळणार आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *