Dehugaoan News: नगरपंचायतीची सदस्या संख्या निश्चित, ‘एवढे’ असणार नगरसेवक

Dehugaoan News: नगरपंचायतीची सदस्या संख्या निश्चित, ‘एवढे’ असणार नगरसेवक
Pckhabar-नव्याने स्थापन झालेल्या तीर्थक्षेत्र देहूगाव नगरपंचायतीची सदस्या संख्या निश्चित झाली आहे. 2011च्या जनगणनेनुसार नवीन नगरपंचायतीमध्ये 17 सदस्य असणार आहेत. सदस्य संख्या निश्चतीचे विभागीय आयुक्तांचे पत्र 8 जानेवारीला प्राप्त झाले आहे. सदस्य संख्या निश्चित झाल्याने लवकरच निवडणूक आयोगाकडून वार्ड रचना आणि वार्ड आरक्षण जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

देहूची लोकसंख्या 40 हजारापेक्षा जास्त आहे. त्यामुळे देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये नुकतेच रुपांतर झाले आहे. ग्रामपंचायतीमध्ये पूर्वी 17 सदस्य होते. नगरपंचयातमध्ये देखील 17 सदस्यच संख्या निश्चित झाली आहे.

सदस्य संख्या निश्चित झाल्याने वार्ड रचना आणि वार्ड आरक्षण पुढील 15 दिवसात जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे इच्छुकांनी आत्तापासूनच निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. नगरपंचायतीचा पहिला नगरसेवक होण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *