Pimpri news: भाजप- राष्ट्रवादीच्या श्रेयवादात आवास योजनेची सोडत रद्द

Pimpri news: भाजप- राष्ट्रवादीच्या श्रेयवादात आवास योजनेची सोडत रद्द

Pckhabar- पंतप्रधान आवास योजनेची सोडत रद्द करण्याचा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अचानक निर्णय घेतला. यामुळे सत्ताधारी भाजपच्या संतप्त नगसेवकांनी पालिकेतील आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या मांडला.

यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, स्थायी सभापती संतोष लोंढे, भाजपचे पक्षनेते नामदेव ढाके, एकनाथ पवार, उपमहापौर केशव घोळवे, विलास मडिगरे, मोरेश्वर शेडगे, बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे, सोनाली गव्हाणे, शिक्षण सभापती मनीषा पवार, कमल घोलप, शारदा बाबर, सुनीता तापकीर, शीतल शिंदे, क्रीडा सभापती उत्तम केंदळे, अभिषेक बारणे, अंबरनाथ कांबळे, तुषार हिंगे, कुंदन गायकवाड आदी उपस्थित होते.

 

पंतप्रधान आवास योजनेची सोडत आज काढण्यात येणार होती. माजी महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ही सोडत घेण्यात येणार होती. या कार्यक्रमाला पालकमंत्री अजित पवार यांची केवळ उपस्थिती लावण्यासाठी निमंत्रित करण्यात आली होती. पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोडत घेणार नसल्याचे समजताच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी चिंचवड येथे रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहासमोर आंदोलन केले. परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे आयुक्त हर्डीकर यांना हा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की ओढवली.

सोडतीचा कार्यक्रम रद्द केल्याचे समजताच भाजपच्या संतप्त नगरसेवकांनी आयुक्तांवर संताप व्यक्त करत त्यांच्या दालनासमोर ठिय्या मांडला. आयुक्तांच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन या निर्णयाचा निषेध केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *