Dehu STVD Premier League News: सिंहगड संघाचा रायगड संघावर दणदणीत विजय
सिंहगड संघाने पटकाविला ‘मैत्री चषक 2021’
Pckhabar- संत तुकाराम विद्यालय देहू 2001 च्या SSC batch ने आयोजित केलेल्या S.T.V.D premier league क्रिकेटच्या अतिंम सामन्यांत रायगड संघाने दिलेले 66 धावांचे आव्हान सिंहगड संघाने 1 बाद 66 धावा करून सामन्यांत दणदणीत विजय मिळवला. सिंहगड संघाचे कर्णधार आणि देहूगाव ग्रामपंचायतचे आदर्श उपसरपंच स्वप्नील आप्पा काळोखे यांच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळवला.

देहूगाव, झेंडे मळा येथे रविवारी या क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सिंहगड संघाचे कर्णधार स्वप्नील आप्पा काळोखे, शिवनेरी संघाचे कैलास येळवंडे, प्रतापगड संघाचे सागर भसे तर रायगड संघाचे तुषार झेंडे कर्णधार होते. या चार संघात प्रत्येकी 3-3 सामने झाले. शिवनेरी संघ 3 सामने पराजित झाला. प्रतापगड संघाने 1 सामना जिंकला. रायगड संघाने 2 सामने जिंकले. तर सिंहगड संघाने 3 सामने जिंकले.
अतिंम सामना सिंहगड व रायगड संघात रंगला. सिंहगड संघाचे कर्णधार स्वप्नील आप्पा काळोखे यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रायगड संघाने प्रथम फलंदाजी करताना सहा ओव्हरमध्ये 65 रन बनवले. कॅप्टन तुषार झेंडे यांनी 27 रन बनवून सिंहगड पुढे 66 धावांचे आव्हान ठेवले. सिंहगड संघाचे फलंदाज गोरख मंजुळे, ॲड. विक्रम हगवणे, निलेश अशोक झेंडे यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत 1 ओव्हर बाकी ठेवून 1 बाद 66 धावा करत या अतिंम सामन्यात दणदणीत विजय मिळवला.
या स्पर्धेत बेस्ट बॉलर प्रवीण बालघरे, बेस्ट बॅट्समन ऋषिकेश कुलकर्णी, मॅन ऑफ दी सिरिज गोरख मंजुळे यांना गौरविण्यात आले.
यावेळी देहूगाव ग्रामपंचायतचे आदर्श उपसरपंच आणि सिंहगड संघाचे कर्णधार स्वप्नील आप्पा काळोखे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ”खेळ म्हटला की हार-जीत आहेच. या स्पर्धेनिमित्त 20 वर्षांनंतर सर्व बालमित्र एकमेकांना भेटले आहेत. यापेक्षा चांगले ‘गेट टू गेदर’असू शकत नाही. यामुळे मोठा आनंद होत आहे. शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. सर्व मित्र आप-आपल्या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्याचा आपला मानस असल्याचे” काळोखे शेवटी म्हणाले.
या स्पर्धेचे चषक देहूगाव ग्रामपंचायतचे आदर्श उपसरपंच स्वप्नील आप्पा काळोखे आणि विशाल काळोखे यांनी स्पाॅन्सर केले होते. स्पर्धेसाठी निलेश काळोखे, गोरख मंजुळे, निलेश झेंडे, तुषार झेंडे, विकास झेंडे यांनी विशेष प्रयत्न केले. 
बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply