Dehu news: डॉ. सुहास जोशी यांचा ‘कोरोना योद्धा’ पुरस्काराने सन्मान

Pckhabar-पुणे येथील स्मृति साधना संस्थेच्या वतीने श्री क्षेत्र देहूतील डॉक्टर सुहास जोशी यांच्या कोरोनाच्या काळातील विशेष सेवाभावी कार्याबद्दल ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मान करण्यात आला.

पुण्यात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणूताई गावस्कर, विवेक वेलणकर, वेनुताई गोखले, ए सी पी. दिसले आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. जोशी यांचा वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल देहूगावातील अभंग प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *