Maval news … अन् आमदार सुनिल शेळके यांनी सोडली विना टोल वाहने!
Pckhabar-जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे टोल नाक्याजवळ होणा-या रोजच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शनिवारीही टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. याच मार्गाने जाणारे मावळ विधानसभेचे आमदार सुनिल शेळके यांनी वाहतूक कोंडी पाहून मोटारीतून खाली उतरत त्यांनी सर्व वाहने विना टोल सोडत महामार्ग मोकळा केला.
शनिवार आणि रविवारी महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. टोल नाक्यावरील दुर्तफा एक किलोमीटर अंतरापर्यंत गाड्यांच्या लांबच रांगा लागलेल्या असतात. जिथे वाहनांना पाच मिनिटांचा वेळ लागणे आवश्यक आहे. तिथे तासाभराचा वेळ वाया गेल्याने ताटकळत बसावे लागत आहे. टोलच्या नावाखाली पैसे घेऊन नागरिकांना योग्य सुविधा मिळत नसल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.
शनिवारीही टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. याच मार्गाने जाणारे मावळ विधानसभेचे आमदार सुनिल शेळके यांनी वाहतूक कोंडी पाहून मोटारीतून खाली उतरत त्यांनी सर्व वाहने विना टोल सोडत महामार्ग मोकळा केला. त्यामुळे वाहन चालकांनी आमदार शेळके यांना धन्यवाद दिले.










Leave a Reply