Pimpri Corona News: शहरात आज 167 नवीन रुग्णांची नोंद, 158 जणांना डिस्चार्ज; 5 मृत्यू

Pimpri Corona News: शहरात आज 167 नवीन रुग्णांची नोंद, 158 जणांना डिस्चार्ज; 5 मृत्यू

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 167 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 158 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजपर्यंत 97 हजार 790 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 94 हजार 316 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1772 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 736 अशा 2508 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 573 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 3094 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

महापालिका हद्दीतील चार आणि पालिका हद्दीबाहेरील एक अशा पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पिंपळेगुरव येथील 65 वर्षीय पुरुष, भोसरीतील 68 वर्षीय पुरुष, नेहरुनगर येथील 69 वर्षीय पुरुष, दापोडीतील 53 वर्षीय महिला, जुन्नर येथील 67 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील 268 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 7 प्रवाशांचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेला (एनआयव्ही) UK स्ट्रेन करीता जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविले होते. त्यात तीघांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तर, तर तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचे UK स्ट्रेन B.1.1.7 चा रिपोर्ट पॉझिटीव्ह असून तिघांची प्रकृती चांगली आहे. एकाचा अहवाल प्रलंबित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *