Pimpri news: पंतप्रधान आवास योजनेची सोमवारी सोडत
Pckhabar : पिंपरी चिंचवड महापालिका चर्होली, रावेत आणि बोर्हाडेवाडी येथे पंतप्रधान आवास योजनेमधून गरीबांसाठी गृहप्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पासाठी सोमवारी दुपारी तीन वाजता चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती महापौर माई ढोरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यावेळी उपमहापौर केशव घोळवे, सभागृह नेता नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे उपस्थित होते. ही सोडत माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महापौर माई ढोरे भूषविणार आहेत. कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, संग्राम थोपटे उपस्थित राहणार आहेत.
चर्होली येथे 1442, रावेत येथे 934 आणि बोर्हाडेवाडी येथे 1288 अशा एकूण 3664 सदनिका महापालिका बांधत आहे. हे गृहप्रकल्प येत्या दीड वर्षात पूर्ण होतील असे ढाके यांनी सांगितले.










Leave a Reply