Pimpri Corona News: चिंता वाढली! शहरात नवीन कोरोना स्ट्रेनचे तीन रुग्ण

Pimpri Corona News: चिंता वाढली! शहरात नवीन कोरोना स्ट्रेनचे तीन रुग्ण

Pckhabar- वेगाने प्रसार होणा-या नवीन कोरोनाचे पिंपरी-चिंचवड शहरात तीन रुग्ण पॉझिटीव्ह सापडले आहेत. त्यांच्यावर भोसरीतील रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर, शहराच्या विविध भागातील 146 आणि महापालिका हद्दीबाहेरील 4 अशा 150 नवीन रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली आहे.

इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी- चिंचवड शहरातील 268 प्रवाशांचा शोध घेण्यात आला. त्यापैकी सात प्रवाशांचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेला (एनआयव्ही) कडे यूके स्ट्रेन करीता जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविले होते. त्यात तिघांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. तर, तिघांचे रिपोर्ट यूके स्ट्रेन B.1.1.7 करीता पॉझिटीव्ह आले आहे. तिघांची प्रकृती चांगली आहे. तर, एकाचा अहवाल प्रलंबित आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 146 आणि महापालिका हद्दीबाहेरील 4 अशा 150 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 91 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात आजपर्यंत 97 हजार 442 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 93 हजार 997 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 1767 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 735 अशा 2502 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 639 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1983 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. शहरातील निगडीतील 46 वर्षीय महिलेचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *