Talegaon Dabhade news: विविध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

 

Talegaon Dabhade news: विविध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
Pckhabar-स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषदे मार्फत घेण्यात आलेल्या विविध Online स्पर्धेतील विजेते, उत्कृष्ठ काम करणारे सफाई कर्मचारी तसेच पर्यावरणपूरक उपक्रम राबविणा-या नागरिकांचा सन्मान सोहळा तळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृहात घेण्यात आला.

कार्यक्रमाची सुरवात मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सामुदायिक हरित शपथ घेऊन केली. यावेळी नगरसेवक रविंद्र अवारे, निखील भगत, अरुण भेगडे पाटील, रोहित लांघे, नगरसेविका उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे. आरोग्य विभागाच्या सभापती सुलोचना अवारे, मंगल जाधव, मंगल भेगडे, शोभा भेगडे, विभावरी दाभाडे, हेमलता खळदे, नीता काळोखे, काजल गटे नागरिक उपस्थित होते.

यावेळी ओल्या कचऱ्यापासून घरीच कंपोस्ट खत बनविणे, Rain Water Harvesting, सौर ऊर्जेचा वापर, सुक्या कचऱ्याचा पुन:वापर, Online स्पर्धा ई. पर्यवरणपूरक उपक्रम राबविणा-या नागरिकांना सन्मानचिन्ह व तुळशीचे रोप देऊन गौरवण्यात आले.

यावेळी नगराध्यक्षा जगनाडे यांनी पर्यावरणपूरक उपक्रम राबवत असलेल्या नागरिकांचे अभिनंदन केले. मुख्याधिकारी झिंजाड व आरोग्य विभागाच्या सभापती अवारे यांनी तळेगावकरांमध्ये स्वच्छता जनजागृतीबाबत अधिक काम करणे आवश्यक आहे. तसेच उपनगराध्यक्षा दाभाडे यांनी स्वच्छता सेवकांच्या योगदानाबाबत त्यांचे आभार मानले.       

सन्मान सोहळ्या दरम्यान पर्यावरणपूरक उपक्रम करत असलेल्या नागरिकांपैकी मंगेश जोशी, रूपक साने, पूजा कुरुंदवाड, रेखा कशेळकर व दिनेश नीलकंठ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.    

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप गायकवाड यांनी केले. आभार नगरसेवक रोहित लांघे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *