Lonavala news: शिक्षकांना पुर्ण पगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू- मंत्री वर्षा गायकवाड

 


Lonavala news: शिक्षकांना पुर्ण पगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू- मंत्री वर्षा गायकवाड
Pckhabar- देशाचे भविष्य घडविण्याचे मोलाचे काम करणार्‍या प्रत्येक शिक्षकाला पुर्ण पगार मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे व नपा मनपा शाळेत काम करणार्‍या सर्व शिक्षकांची देखील तीच मागणी आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत येत्या पंधरा दिवसात बैठक लावत हा विषय शासनाच्या माध्यमातून सोडविण्याचा माझा प्रयत्न राहिल असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी न.पा. म.न.पा. शिक्षक संघटनेला दिले .

महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघटनेच्या वतीने राज्यातील शंभर शिक्षकांना आदर्श शिक्षण, प्रेरणा पुरस्कार , कोरोना योद्धा , तंत्रमित्र असे विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी आमदार संजय जगताप, न.पा. म.न.पा. शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी, शिक्षण संचालक प्राथमिक विभाग दत्तात्रय जगताप, शिक्षण उपसंचालक पुणे औदुंबर उकिरडे, शिक्षण अधिकारी मिनाक्षी शेंडकर, मुख्याधिकारी रवि पवार, माऊली दाभाडे, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कविश्वर, प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे, जयश्री धायगुडे , न.पा. म.न.पा. संघटनेच्या महिला संघटक साधना साळुखे, राज्याचे उपाध्यक्ष आनंद कोळी , शिवाजी राजिवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

वर्षा गायकवाड म्हणाल्या कोरोनाकाळात शिक्षकांनी सहकार्य केले म्हणून महाराष्ट्रात आज शिक्षण सुरू आहे . कोरोना येईल, मास्क, सॅनिटायझर वापरावा लागेल, माणसापासून अंतर राखून उभं रहावे लागेल असे कधी वाटले नव्हते. कोरोना काळात शिक्षणाचे काय हा प्रश्न उभा असताना शिक्षकांनी सहकार्य केल्याने महाराष्ट्रात आँनलाईन, ऑफ लाईन, यु ट्युब, दूरदर्शन अशा विविध माध्यमातून शिक्षण सुरू राहिले .
शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप म्हणाले विद्यार्थांना देवाच्या ठिकाणी मानून शिक्षण दानाचे काम शिक्षकांनी करावे, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही काळाची गरजेचे आहे . आमदार संजय जगताप यांनी शिक्षकांचे विविध प्रश्न मांडत पटसंख्या वाढ व शाळाच्या विकासासाठी काम करायचे हा विचार करून शिक्षण मंडळांचे पुर्नजीवन करावे अशी मागणी केली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक न.पा. म.न.पा. शिक्षक संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी केले तर प्रतिभा दरेकर यांनी सुत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *