Maval news : मावळात 190 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध
Pckhabar-मावळ तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीच्या एकूण 515 जागापैकी 190 जागा बिनविरोध झाल्या असून 7 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्याचबरोबर उर्वरित 325 जागांसाठी 746 उमेदवार रिंगणात असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.
ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमानुसार सोमवार (दि 4) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. नवलाख उंब्रे, येलघोल, आंबेगाव, पाचाणे, कुसगाव पमा, दारूंब्रे, आढे या ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरित 50 ग्रामपंचायतीच्या 325 जागांसाठी 746 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
ग्रामपंचायत निहाय व बिनविरोध व निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार संख्या.
नवलाख उंब्रे सर्व 13 जागा बिनविरोध,
माळेगाव बुद्रुक 5 बिनविरोध, 4 जागांसाठी 9 उमेदवार,
इंगळुन – 4 बिनविरोध, 3 जागांसाठी 6 उमेदवार,
खांड – 7 बिनविरोध, 2 जागांसाठी 6 उमेदवार,
डाहुली – 7 जागांसाठी 15 जण रिंगणात,
कशाळ – दोन बिनविरोध, सात जागांसाठी 46 जण,
वडेश्वर – एक बिनविरोध, 10 जागांसाठी 23 जण,
कुसवली- तीन बिनविरोध, 4 जागांसाठी 10 जण,
आढे – सर्व सात जागा बिनविरोध,
परंदवडी – एक बिनविरोध, आठ जागांसाठी 16 जण,
उर्से – एक बिनविरोध, 10 जागांसाठी 29 जण,
सोमाटणे – 12 बिनविरोध, एक जागेसाठी दोन जण,
धामणे- 9 जागांसाठी 18 जण,
दारुंब्रे – सर्व नऊ जागा बिनविरोध,
गहूंजे – दोन बिनविरोध, 9 जागांसाठी 21 जण,
सांगावडे – 4 बिनविरोध, 3 जागांसाठी 6 जण रिंगणात,
आंबी- वारंगवाडी-गोळेवाडी या 2 नं वाॅर्डातील तीनही उमेदवार बिनविरोध, 8 जागांसाठी 19 जण रिंगणात,
माळवाडी – 10 बिनविरोध, एका जागेसाठी 2 जण रिंगणात,
करंजगाव- 4 बिनविरोध, 5 जागांसाठी 17 जण,
गोवित्री – एक बिनविरोध, 8 जागांसाठी 17 जण,
साई- 4 बिनविरोध, 5 जागांसाठी 9 जण रिंगणात,
घोणशेत – तीन बिनविरोध, 6 जागांसाठी 13जण,
चिखलसे – 3 बिनविरोध, 6 जागांसाठी 11जण,
खडकाळा – 17 जागांसाठी 43 जण, कुसगाव खुर्द – 7 जागांसाठी 16 जण,
टाकवे बुद्रुक – एक बिनविरोध, 12 जागांसाठी 36 जण रिंगणात,
साते- 3 बिनविरोध, 8 जागांसाठी 20 जण, नाणे – 1 बिनविरोध, 8 जागांसाठी 16 जण,
कांब्रे नामा – सहा बिनविरोध, तीन जागांसाठी 6 जण,
वेहेरगाव – 2 बिनविरोध, 7 जागांसाठी 16 जण,
ताजे- 5 बिनविरोध, 4 जागांसाठी 8 जण,
मळवली – दोन बिनविरोध, 7 जागांसाठी 20 जण,
पाटण – दोन बिनविरोध, 7 जागांसाठी 17 जण,
कार्ला – 9 जागांसाठी 21 जण,
खांडशी – दोन बिनविरोध, 5 जागांसाठी 12 जण रिंगणात,
उकसान – 7 जागांसाठी 15 जण,
शिरदे – 4 बिनविरोध, 3 जागांसाठी 10 जण रिंगणात,
तिकोणा – दोन बिनविरोध, 5 जागांसाठी 10 जण रिंगणात,
कोथुर्णे – चार बिनविरोध, 3 जागांसाठी 6 जण,
वारू – 9 जागांसाठी 20 जण,
मळवंडी ठुले – एक बिनविरोध, 6 जागांसाठी 12 जण,
आपटी – 5 बिनविरोध, दोन जागांसाठी 4 जण,
अजीवली- 7 जागांसाठी 14 जण,
मोरवे – 6 बिनविरोध एका जागेसाठी 2 जण,
महागाव – 9 जागांसाठी 20 जण,
आंबेगाव – सर्व 7 जागा बिनविरोध,
कुसगाव बुद्रुक – 17 जागांसाठी 37 जण,
कुरवंडे – एक बिनविरोध, 10 जागांसाठी 29 जण,
येलघोल – सर्व 7 जागा बिनविरोध, शिवली – तीन बिनविरोध, 6 जागांसाठी 12 जण,
येळसे – 7 जागांसाठी 14 जण,
बऊर- एक बिनविरोध, 8 जागांसाठी 17 जण,
पाचाणे – सर्व 9 जागा बिनविरोध,
कुसगाव पमा- सर्व 7जागा बिनविरोध,
थुगाव – 3 बिनविरोध, 4 जागांसाठी 10 जण,
शिवणे – 3 बिनविरोध, 6 जागांसाठी 12 जण रिंगणात,
आढले खुर्द – 4 बिनविरोध, 5 जागांसाठी 10 जण रिंगणात आहेत.
उर्वरित 325जागांसाठी दुरंगी व तिरंगी निवडणूक होणार असून निवडणुकीचा प्रचार जोरदारपणे सुरु झाला आहे. बंडखोरांना थांबवण्यात यश आले नसल्याने ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची संख्या कमी झाली आहे. मावळात 7 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने मावळचे आमदार सुनील शेळके या ग्रामपंचायतींना 11 लाख रुपयांचा निधी देणार आहेत.










Leave a Reply