Pimpri news: प्रतिबंधक लस घेण्यासाठी दोन दिवसात नोंदणी करा

Pimpri news: प्रतिबंधक लस घेण्यासाठी दोन दिवसात नोंदणी करा


Pckhabar- कोविड -19 वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी  कोरोना लस निर्मितीसाठी मोठया प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांनी आगामी कोविड 19 लसीकरण नियोजनासाठी भारत देशातील सर्व शासकिय व खाजगी आरोग्य सेवा कर्मचारी यांची माहिती अहवाल संकलन करण्याचे काम सुरु आहे. ज्या संस्थांनी अद्यापही नोंदणी केली नाही त्यांनी कोविड-19 प्रतिबंधक लस घेण्याबाबतची नोंदणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सारथी अ‍ॅपवर दोन दिवसात करावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील शासकिय, मनपा व खाजगी आस्थापना आरोग्य व वैद्यकिय क्षेत्रातील नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना कोवीड-19 प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड-19 प्रतिबंधक लस पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहरातील शासकिय, मनपा व खाजगी आस्थापना आरोग्य व वैद्यकिय क्षेत्रातील नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व खाजगी वैद्यकिय व्यवसायिक, इंडियन मेडिकल असोशिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोशिएशन, पिंपरी चिंचवड डॉक्टर असोशिएशन, दंततज्ञ संघटना, पॅथोलॉजिस्ट संघटना, नर्सेस असोशिएशन, फार्मासिस्ट असोशिएशन यांचेकडून कोविड-19 प्रतिबंधक लस घेण्याबाबतची नोंदणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्मार्ट सारथी ऍप वर भरणेकामी आत्तापर्यंत चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, वैद्यकिय विभागाकडून पुनश्च: आवाहन करण्यात येते की, ज्या संस्थांनी अद्यापही नोंदणी केली नाही त्यांनी कोविड-19 प्रतिबंधक लस घेण्याबाबतची नोंदणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सारथी ऍप वर तातडीने दोन दिवसात करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *