Delhi news: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आमदार सुनिल शेळके यांनी मानले आभार
Pckhabar- राष्ट्रीय महामार्ग 548D तळेगाव-चाकण (24km) रस्त्याच्या क्राँक्रिटीकरणासाठी 300 कोटी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी आभार मानले.
मंत्री गडकरी यांनी NHAI मुख्य अभियंता विनय देशपांडे यांना फोन करुन सदरील कामासंदर्भातील कार्यवाही त्वरीत सुरु करण्याचे निर्देश दिले.
तसेच मागील वर्षभरापासून पाठपुरावा करत असलेल्या जुना पुणे मुंबई महामार्गावरील वाहतुक कोंडी व वाढते अपघात रोखण्यासाठी देहुरोड, सोमाटणे, तळेगाव, वडगाव, कान्हे, कार्ला या जंक्शनवर उड्डाणपूलांची कामे लवकरात लवकर सुरु करण्यासंदर्भात महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला (MSRDC) आवश्यक परवानगी द्यावी ही विनंती आमदार शेळके यांनी केली.










Leave a Reply