Pimpri news: कन्या विद्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

Pimpri news: कन्या विद्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
Pckhabar-रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ शिक्षिका सौ उनवणे बी एस यांच्या हस्ते करण्यात आले.

ऑनलाईन माध्यमातून इयत्ता आठवी मधील विद्यार्थिनी कु बर्गे अंजली, कु निकम तनुजा, कु कुदळे स्नेहा, कु जाधव प्राजक्ता यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनवर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ शारदा शेटे यांनी सवित्री बाई फुले यांचे जीवचरित्र व कार्य आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

सावित्रीच्या लेकींचा सत्कार करण्यात आला. थेरगाव फाऊंडेशन आयोजित एकपात्री प्रयोग स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त विद्यार्थिनी कु अंशू विजय दराडे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका समावेशक शिक्षण विभाग जागतिक दिव्यांग दिन सन २०२०-२१ निमित वक्तृत्व स्पर्धेत सन्मान प्राप्त झालेल्या कु नेहा सतीश शिंदे या विद्यार्थिनींचा मुख्याध्यापिका सौ शारदा शेटे, पर्यंवेक्षिका सौ उर्मिला पाटील यांच्या हस्ते विद्यालयात सत्कार करण्यात आला.

सर्व सेवक स्कूल कमिटी सदस्य यांच्या मार्फत या विद्यार्थीनींचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका सौ कांबळे विद्या यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *