Maharashtra news : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात राजीनामा देणार; सातव, पटोले, ठाकूर यांच्या नावाची चर्चा

Maharashtra news : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात राजीनामा देणार; सातव, पटोले, ठाकूर यांच्या नावाची चर्चा
Pckhabar- बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजीनामा देण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी सध्या सहा नेत्यांची नावे चर्चेत असून महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षश्रेष्ठी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (who will be new maharashtra congress president?)

 

बाळासाहेब थोरात  रविवारपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. पक्षाच्या तीन तीन जबाबदाऱ्या झेपणं अवघड जात असल्याने प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी ते दिल्लीत आले आहेत.  त्यामुळे इच्छुकांनी मोर्चेबांधणी करत आहेत.  काँग्रेस नेते  मंत्री सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर या राज्यातील नेत्यांची नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. त्याशिवाय विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, खासदार राजीव सातव यांची नावे चर्चेत आहेत.  काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *