‘We Maratha’ संघटनेच्या अध्यक्षपदी स्नेहल कदम

 

‘We Maratha’ संघटनेच्या अध्यक्षपदी स्नेहल कदम
Pckhabar- आम्ही मराठा संघटनेच्या वतीने नवीन वर्ष 2021 मध्ये ‘शैक्षणिक प्रगत पदाधिकारी’ या संकल्पनेनुसार पदाचे वाटप करण्यात आले आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी स्नेहल कदम-पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यांच्यासह विविध विभागाचे पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत.

आम्ही मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध शिवाजी शेलार यांनी नवीन वर्षात संघटनेत अनेक फेरबदल केले असून अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन एक महिलेकडे नेतृत्व दिले आहे. संघटनेच्या ध्येय धोरणानुसार सर्व पदाधिकारी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून कार्य करतील. तसेच समाजाच्या भल्यासाठी कार्यरत राहतील, असा विश्वास संस्थापक अनिरुद्ध शेलार यांनी pckhabar. Com शी बोलताना व्यक्त केला.

नुतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे:
अध्यक्ष- स्नेहल कदम-पाटील
उपाध्यक्ष- विशाल बोरसे
सरचिटणीस- रणजित जाधव
राज्य समन्वय आणि प्रवक्ता- माऊली इंगळे
महिला समन्वय- योजना मोरे
महिला विंग प्रमुख- श्रध्दा नरोडे
सोशल मीडिया समन्वय- संदीप निर्मळ
पुणे जिल्हा अध्यक्ष- अभिजित वाबळे
मुंबई जिल्हा अध्यक्ष- योगेश सावंत