Dehu news: इंद्रायणीनगर सोसायटीच्या नामफलकाचे उद्घाटन

ही बातमी शेअर करा.

Dehu news: इंद्रायणीनगर सोसायटीच्या नामफलकाचे उद्घाटन

Pckhabar- इंद्रायणीनगर सोसायटीमधील कमिटीने सोसायटी रजिस्टर केली. त्यामुळे सोसायटीच्या मुख्य बोर्डचा उद्घाटन सोहळा नवीन वर्षाच्या मुहूर्तावर पार पडला. कमिटीच्या वतीने सोसायटीत विविध कार्यक्रम घेतले जातात. तसेच सोसायटीच्या विकासावर भर दिला.

उद्घाटन प्रसंगी आमदार सुनील शेळके यांच्या वतीने अतुल मराठे, कांतीलाल काळोखे, विकास कंद, सचिन कुंभार, महेंददादा झेंडे, स्वप्नील काळोखे, रुपेश सोनवणे, आप्पा मोरे, राम खाडे इतर मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा श्रीफळ आणि तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.

अतुल मराठे, कांतीलाल काळोखे, विकास कंद यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सर्वानी इंद्रायणीनगरचा विकास व्हावा, यासाठी आमदार सुनिल शेळके आणि आम्ही प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली.

नवनाथ गायकवाड यांनी सर्व मान्यवराचे आभार मानले. कार्यक्रमास कमिटीमधून दीपक साळवे, रमेश चव्हाण, नवनाथ गायकवाड, रमेश यादव, पंढरीनाथ माळी, सुनील निकम, सागर लढे, अंकुश पवार, दत्ता गाढवे, राहुल सूर्यवंशी आदी उपस्थित होते. दीपक गजरे यांनी सूत्रसंचालन केले.


ही बातमी शेअर करा.