
Pimpri Corona News: शहरात आज 125 नवीन रुग्णांची नोंद, 60 जणांना डिस्चार्ज; 4 मृत्यू
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 125 नवीन रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 60 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात आजपर्यंत 96 हजार 608 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 93 हजार 365 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1756 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 731 अशा 2487 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 632 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1511 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.
शहरातील दोन आणि महापालिका हद्दीबाहेरील दोन अशा चार जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात आकुर्डीतील 65 वर्षीय पुरुष, चिंचवड येथील 82 वर्षीय महिला, आंबेगाव मधील 45 वर्षीय पुरुष आणि निमगाव येथील 63 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.










Leave a Reply