Dehuroad news: अयोध्येतील राम मंदिरासाठी रघुवीर शेलार यांच्याकडून एक लाखाची मदत

 

Dehuroad news: अयोध्येतील राम मंदिरासाठी रघुवीर शेलार यांच्याकडून एक लाखाची मदत
Pckhabar- अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर उध्दवराव शेलार यांच्या परिवाराच्या वतीने एक लाख एक हजार 151 रुपयांचा निधी हभप अनिल महाराज पाटील यांच्या हस्ते देहू गटाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक नरेश गुप्ता, सहकार्यवाह दीपक जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या वाढदिवसानिमीत्त हा निधी देण्यात आला. यावेळी भाजपाचे देहूरोड शहर अध्यक्ष बाळासाहेब शेलार, हभप शिवाजीराव पवार, अमरदेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लहू शेलार, देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मदन सोनिगरा, नगरसेवक अरुण भेगडे, चेतन भुजबळ, नगरसेवक विशाल खंडेलवाल, नगरसेवक राहुल बालघरे, विनय बरलोटा, विलास शिंदे, दिनेश सिंह, तुकाराम जाधव, उमाशंकर सिंह, दिलीप नायर, संदेश भेगडे, अमित भेगडे, सचिन शेलार, दिनेश श्रीवास्तव, मुकेश पाठक, प्रवीण फाकटकर आदी भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्वाहिंदू परिषद- बजरंगदलाचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी मावळ तालुक्यातून पहिला निधी देण्याचा बहुमान मिळविल्याबद्दल माजी राज्यमंत्री भेगडे यांनी रघुवीर शेलार आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले. ज्या नागरिकांना श्रीराम मंदिरासाठी निधी द्यायचा आहे त्यांनी श्री राम जन्मभूमि तीर्थक्षेत्र Shri Ram Janmbhoomi Teerthkshetra या नावाने धनादेश द्यावा, असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *