Dehu news: डाॅ.अहेफाज मुलाणी यांचा अभंग प्रतिष्ठानतर्फे सन्मान

Dehu news: डाॅ.अहेफाज मुलाणी यांचा अभंग प्रतिष्ठानतर्फे सन्मान

Pckhabar- ‘इंद्रायणी आहे साक्षीला’ या मासिक कवी संमेलनाच्या माध्यमातून गेल्या एक वर्षापासून श्री क्षेत्र देहू व पंचक्रोशीतील कविंना व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल ‘इंद्रायणी आहे साक्षीला’ या मासिक कवी संमेलन उपक्रमाचे प्रमुख, डॉ.अहेफाज मुलाणी यांचा अभंग प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी सुप्रसिद्ध लेखक, कवी अरूण बोराडे, डाॅ. विवेक मोरे, लेखक दादाभाऊ गावडे, अभंग प्रतिष्ठानचे सदस्य, इंद्रायणी आहे साक्षीला या कविसंमेलनातील सहभागी कवी व रसिकजन उपस्थित होते.

डॉ. अहेफाज मुलाणी यांनी कवी संमेलनाचे अतिशय सुंदरपणे नियोजन करून ही मासिक कविसंमेलनाची संकल्पना यशस्वी केली. या कवी संमेलनामुळे देहूगावसह इतर भागातील अनेक नवोदित कवींना आपल्या कविता सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *