Pimpri School news: 9 ते 12 वीच्या शाळा, महाविद्यालये 4 जानेवारीपासून सुरु होणार

Pimpri School news: 9 ते 12 वीच्या शाळा, महाविद्यालये 4 जानेवारीपासून सुरु होणार

Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील 9 ते 12 वीच्या शाळा, महाविद्यालये 4 जानेवारी 2021 पासून सुरु होणार आहेत. याबाबतचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहे. महापालिका हद्दीत 9 ते 12 पर्यंतच्या पालिका, खासगी अशा 282 शाळा आहेत. पालिकेच्या नववी ते दहावीच्या 18 आणि 6 उर्दु अशा 24 शाळा असून 4490 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 229 शिक्षक अध्यापनाचे काम करतात.

शहरातील 9 ते 12 वीचे वर्ग 23 नोव्हेंबर 2020 पासून सुरु करण्याचे नियोजन केले होते. पण, शहरातील रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आणि शिक्षकांच्या कोरोनाच्या चाचण्या पूर्ण झाल्या नसल्याने महापालिकेने 30 नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

पुन्हा त्यामध्ये वाढ करत 13 डिसेंबर, 3 जानेवारी 2021 पर्यंत शाळा बंद ठेवण्याच्या निर्णयात वाढ केली होती. आता शाळा बंद ठेवण्याचा आदेश मागे घेत महापालिका हद्दीतील नववी ते बारावीच्या शाळा, महाविद्यालये 4 जानेवारी 2021 पासून सुरु होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *