Dehu news : देहूत 5 जानेवारीला अल्प दरात ‘थायरॉईड’ तपासणी शिबीर
Pckhabar- कर्तव्य फाउंडेशन देहूचे संस्थापक सदस्य कै. अक्षय सतीश आगरवाल यांच्या जन्मदिनाच्या स्मृति प्रित्यर्थ कर्तव्य फाउंडेशन देहू आणि विघ्नहर्ता पॅथॉलॉजि लॅब देहू यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत अल्प दरात थायरॉईड तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

देहूगाव, वडाचा माळ, भैरवनाथ चौकातील विघ्नहर्ता पॅथॉलॉजि लॅबमध्ये
5 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 का कालावधीत हे शिबीर होणार आहे. शिबीरामध्ये 550 रुपयात होणारी थायरॉईड तपासणी फक्त १५० रुपयांमध्ये होणार आहे.
बदलत्या लाईफस्टाईल मुळेही हा आजार अनेकांना बळावताना दिसत आहे. थायरॉईड हा आजार १० पैकी ५ जणांना हमखास होतो. विशेष म्हणजे महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला या अधिक धावपळ करतातं. त्यांच्याकडे कामाच्याही जबाबदाऱ्या अधिक असतात. मासिक पाळी, गर्भावस्था या सगळ्यामुळे त्यांच्यात हार्मोन्स बदल होतात. त्यामुळेच महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक असते.
थायरॉईडची लक्षणे
१)अचानक वजन वाढणे.
२)अचानक वजन कमी होणे.
3)केसगळती.
४)नख पातळ होणे.
५)सतत आजारी पडणे.
६)मासिकपाळी अनियमित येणे.
७)शारीरिक बदल होणे.
वरील पैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास थायरॉईड तपासणी करून घ्यावी, असे आवाहन कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9689499449 या क्रमांकावर फोन करावा.










Leave a Reply