Pimpri Corona New News: इंग्लंडहून आलेले आणखी चौघे पॉझिटीव्ह; न्यू स्ट्रेनच्या सहा रुग्णांवर उपचार सुरु
Pckhabar-इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील 267 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 188 प्रवाशांची चाचणी केली असून त्यापैकी 153 जणांचे अहवाल निगेटीव्ह आहेत. तर, सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आहेत. त्यामध्ये आज बुधवारी चार जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. उर्वरित 26 अहवाल प्रलंबित आहेत.
विविध भागातील 167 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 198 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात आजपर्यंत 96 हजार 483 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 93 हजार 305 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1754 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 729 अशा 2483 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 640 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1389 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.
शहरातील दोन आणि महापालिका हद्दीबाहेरील सात अशा नऊ जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात चिंचवड येथील 74 वर्षीय पुरुष, सांगवीतील 55 वर्षीय महिला, चाकण येथील 63 वर्षीय पुरुष, जुन्नर येथील 58, 65 वर्षीय दोन पुरुष, अमरावती येथील 67 वर्षीय पुरुष, देहुरोडमधील 39 वर्षीय पुरुष, विश्रांतवाडीतील 44 वर्षीय पुरुष आणि आळंदीतील 60 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.











Leave a Reply