Pimpri news: सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त समाजप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन
Pckhabar-ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दि.1 जानेवारी ते दि.5 जानेवारी 2020 या कालावधीत मुख्य प्रशासकिय इमारतीमध्ये रांगोळी द्वारे महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर आधारित प्रसंगांचे विविध रांगोळी चित्राद्वारे दर्शन घडविले जाणार आहे. दि.02 जानेवारी 2021 रोजी स.9.00 ते दु. 2.00 रक्तदान शिबिर, कोरोना रॅपिड टेस्ट (अँन्टिजेन), नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या इ.1ली ते 10वी शालेय विद्य्यार्थ्यांच्या चित्रकला, निबंध स्पर्धांचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आलेले आहे. महानगरपालिकेच्या वतीने दि.3 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता मुख्य प्रशासकीय इमारत, पिंपरी येथे, सकाळी 10.40 वाजता महात्मा फुले पुतळा परिसर, पिंपरी चौकात सकाळी 11.00 वाजता मोशी मनपा शाळा, मोशी या ठिकाणी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास महापौर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. दि.03 जानेवारी 2021 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर एकपात्री प्रयोग सादरकर्त्या- श्रीमती शारदा मुंढे, अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांनी दिली.










Leave a Reply