Maval news: एमआयडीसीत भूमिपुत्रांना रोजगाराची संधी द्या; माजी मंत्री बाळा भेगडे यांची उद्योगमंत्र्यांकडे मागणी
Pckhabar- निगडे-आंबळे नियोजित एमआयडीसीत भूमिपुत्रांना रोजगाराची संधी द्यावी. नियोजित एमआयडीसीमध्ये कौशल्य विकास केंद्राची स्थापना करावी, अशी मागणी माजी मंत्री बाळा भेगडे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली. मंत्री देसाई यांनी सकारात्मक चर्चा करून लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे भेगडे यांनी सांगितले.

एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल, प्रांताधिकारी संदेश शिर्के, शांताराम कदम, भिकाजी भागवत, कृष्णा भांगरे, सोमनाथ पवळे, प्रशांत ढोरे, गणेश कल्हाटकर, मोहन घोलप, संतोष जाचक, नथू थरकुडे, गणेश भांगरे, गोपाळ पवळे, हरिभाऊ पवळे, बुधाजी जगेश्वर, बंडू कदम, विठ्ठल कदम, तानाजी करवंदे, बाबूलाल गराडे, मंगेश शेलार, संदेश शेलार यांसह कृती समितीचे पदाधिकारी, शेतकरी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते.
माजी मंत्री बाळा भेगडे म्हणाले, मावळ तालुक्यातील निगडे-आंबळे येथे एमआयडीसी नियोजित आहे. तालुक्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी एमआयडीसीत भूमिपुत्रांना रोजगाराची संधी मिळणे गरजेचे आहे. तरुणांसाठी एमआयडीसीमध्ये कौशल्य विकास सुख केंद्राची स्थापना करावी.










Leave a Reply