Dehu news: ‘इंद्रायणी आहे साक्षीला’ कविसंमेलनाचे विजेते जाहिर!
Pckhabar- देहूतील ‘इंद्रायणी आहे साक्षीला’ या मासिक मराठी कविसंमेलनातील सर्वोत्कृष्ट कवितांचा बक्षिस वितरण समारंभ तीर्थक्षेत्र देहू येथे इंद्रायणी घाट परिसरावर, गाथा मंदिर येथे आज (बुधवार) सायंकाळी 4. 30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या बक्षीस वितरण सोहळ्यात कवी,
साहित्यिक, माजी नगरसेवक, कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण केले जाणार असल्याची माहिती “इंद्रायणी आहे साक्षीला!” या कविमंचाचे संस्थापक आणि आयोजक डॉ. अहेफाज मुलाणी यांनी दिली.
याबाबत माहिती देताना डॉ. मुलाणी म्हणाले, लॉकडाऊन पूर्वी समक्ष झालेल्या तसेच लॉकडाऊन काळात ऑनलाइन डिजिटल कविसंमेलन दर महिन्याला आयोजित केले गेले होते. देहूतील नव्याने सुरू केलेल्या या साहित्यिक चळवळ उपक्रमाची वर्षपूर्ती झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. वर्षभर उपक्रम आयोजन करण्यात प्रा. विकास कंद, प्रा. कुलदीप चव्हाण, देहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव, अमित शिवळे, महेश मोरे, सुनिल कंद, विठ्ठल काळोखे यांचे विशेष सहाय्य लाभले.
या कविसंमेलन उपक्रमातून पहिल्यांदाच व्यासपीठ लाभलेले अनेक कवी; राज्यस्तरीय विविध कवी स्पर्धेतून चमकले आहेत, हे या उपक्रमाचे यश असल्याची भावना डॉ. मुलाणी यांनी व्यक्त केली. त्यासाठी या मासिक उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वच कवींचे त्यांनी आभार मानले. याच प्रोत्साहनातून यापुढेही हा उपक्रम देहूमध्ये सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी जाहिर केले. या उपक्रमात नवोदित कवींनी सहभागी होण्याचे आवाहनही कविमंचाकडून करण्यात आलेले आहे.
विजेते पुढीलप्रमाणे –
कवी. अनिकेत काळोखे, देहू.
कवी. अमित काळोखे, देहू.
कवी. विजय चव्हाण, सांगूर्डी देहू.
कवी. दादाभाऊ गावडे, देहू.
कवी सुनिल हुंडारे, माळवाडी देहू.
कवयित्री रुपाली सोनवणे, लोहगाव.
कवयित्री ज्योती सावंत, तळेगाव दाभाडे.
कवी. रामदास सोनवणे, साकरवाडी, अहमदनगर.
कवी. सागर घरबुडवे, देहू.
कवी. रमाकांत पडवळ, खडकवासला, पुणे.
कवी राहुल जगताप, जांबुत.
कवी सुनिल लोणंदकर, देहू.
कवयित्री सविता दिवेकर, देहू.
कवयित्री वृषाली आढाव, देहू.
कवी. सचिन कुलाळ, बुर्केगाव.
कवी ह. भ. प. प्रशांत महाराज मोरे, देहू.
कवी शुभम शिंदे, देहू.










Leave a Reply