Pimpri Corona News: इंग्लंडहून आलेला आणखी एक पॉझिटीव्ह

Pimpri Corona News: इंग्लंडहून आलेला आणखी एक पॉझिटीव्ह

Pckhabar-इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील 215 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 167 प्रवाशांची चाचणी केली. असून 112 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आहेत. दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामधील एकाचा आज पॉझिटीव्ह रिपोर्ट आले आहे. उर्वरित 53 अहवाल प्रलंबित आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 121 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 156 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजपर्यंत 96 हजार 316 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 93 हजार 107 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1752 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 722 अशा 2474 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 644 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1110 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

शहरातील एक आणि महापालिका हद्दीबाहेरील दोन अशा तिघांचा आज मृत्यू झाला आहे. सांगवीतील 70 वर्षीय महिला, मावळातील 55 वर्षीय पुरुष, खेड येथील 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *