Dehu news : आदर्श उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
Pckhabar- देहूगाव ग्रामपंचायतचे आदर्श उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे यांच्या 2021च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. मधुकर महाराज मोरे, विठ्ठल रुख्मिणी देवस्थान पंढरपूरचे विश्वस्थ ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, विश्वस्त भानुदास महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

देहू संस्थानच्या कार्यालयात हा प्रकाशन सोहळा पार पडला. प्रसिद्ध व्याख्याते प्रा. प्रदीप कदम यांनी दिनदर्शिकेतील महामानव विचार आणि अनोखेपण यांचा समन्वय साधला. स्वप्निल काळोखे यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच शिवाजी महाराज मोरे आणि माणिक महाराज मोरे यांनी स्वप्निल आप्पा काळोखे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.
यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. संतोष महाराज काळोखे, वारकरी महामंडळ विश्वस्त जालिंदर महाराज काळोखे, उमेश महाराज मोरे, उद्योजक आनंदा काळोखे, बाळासाहेब काळोखे, रोहित काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते.

आदर्श उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे प्रास्ताविक करताना म्हणाले, ”सामाजिक कार्य करताना ज्येष्ठांचे मार्गदर्शन गरजेचे असते. ज्येष्ठांनी कौतुक केल्याने सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करताना नवी उर्जा मिळते.”
युवा मित्र अजित काळोखे यांनी निवेदन केले.










Leave a Reply