Pimpri corona News: आज 58 नवीन रुग्णांची नोंद, 172 जणांना डिस्चार्ज, 1 मृत्यू

Pimpri corona News: आज 58 नवीन रुग्णांची नोंद, 172 जणांना डिस्चार्ज, 1 मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 58 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 172 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील पिंपरीतील 63 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात आजपर्यंत 96 हजार 195 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 92 हजार 959 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 1751 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 720 अशा 2471 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 744 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 842 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *