Pimpri news: महापालिका कर्मचा-यांना लाभदायक ठरत असलेली ‘धन्वंतरी स्वास्थ’ योजना बंद होणार

Pimpri news: महापालिका कर्मचा-यांना लाभदायक ठरत असलेली ‘धन्वंतरी स्वास्थ’ योजना बंद होणार

Pckhabar-पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचा-यांना लाभदायक ठरत असलेली ‘धन्वंतरी स्वास्थ’ योजना बंद करण्याची प्रक्रिया आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सुरु केली आहे. खासगी विमा पॉलिसी लागू करण्याची कार्यवाही चालू आहे. त्यामुळे धन्वंतरी स्वास्थ’ योजना बंद होणार आहे.

महापालिका सेवेतील, सेवानिवृत्त कर्मचा-यांसाठी ‘धन्वंतरी स्वास्थ’ ही वैद्यकीय योजना 1 सप्टेंबर 2015 पासून लागू करण्यात आली होती. 7500 कर्मचारी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठी 300 रुपये वर्गणी देत होते. तर, निवृत्त 150 कर्मचारी 150 रुपये वर्गणी भरत असून महापालिका 600 रुपये हिस्सा भरत होते.

मागील काही महिन्यांपासून धन्वंतरी स्वास्थ योजना बंद करण्याचा घाट घातला जात होता. आयुक्त श्रावण हर्डीकर अचानक धन्वंतरी स्वास्थ योजना बंद करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *