Pimpri news: दै जनशक्ती व दै लेवाशक्तीचे संपादक कुंदन ढाके यांचे निधन

Pimpri news: दै जनशक्ती व दै लेवाशक्तीचे संपादक कुंदन ढाके यांचे निधन

Pckhabar- पिंपरी चिंचवड व पुण्यात लोकमान्य पावलेले दैनिक जनशक्ती व दैनिक लेवाशक्तीचे संपादक व सिद्धिविनायक ग्रुप चे संचालक कुंदन दत्तात्रय ढाके(वय 42 वर्षे) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या कुंदन ढाके यांनी पुण्यात बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय काम आहे.भाजप मधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेणारे एकनाथ खडसे यांचे जवळचे सहकारी म्हणून ही त्यांची ओळख आहे.

जळगांव येथील प्रसिद्ध दैनिक जनशक्ती हे त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात सुरू केले.एक दर्जेदार दैनिक कसे असावे याचे त्यांनी उदाहरण दाखवून दिले.त्यानंतर दैनिक लेवाशक्ती हेही दैनिक सुरू केले.

कै कुंदन दत्तात्रय ढाके आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांना चक्कर आली. वायसीएम रुग्णालयात नेले असता मृत घोषित केले. एक उमदा संपादक व यशस्वी बांधकाम व्यवसायिक गेल्याचे सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *