Pimpri news: मराठा समाजाला राज ठाकरे न्याय देऊ शकतील: अनिरुद्ध शेलार यांना विश्वास
Pckhabar- राज्यातील महाविकास आघाडी सरकारसह आतापर्यंत राज्यातील एकाही सत्ताधारी पक्षाने मराठा समाजाला न्याय दिला नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेच आता मराठा समाजाला न्याय देऊ शकतील, असा विश्वास आम्ही मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध शिवाजी शेलार यांनी pckhabar. Com शी बोलताना व्यक्त केला.

शेलार पुढे म्हणाले, मराठा समाजाने आरक्षणासाठी तब्बल 58 मोर्चे काढले. आरक्षणासाठी अनेक मराठा बांधवांनी बलिदान दिले आहे. मात्र, समाजाच्या आरक्षणासाठी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संवेदनशील वाटत नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या तरुणांमध्ये सरकारविषयी चीड निर्माण होत आहे.
समाजाच्या आरक्षणासाठी सर्वच पक्षातील नेत्यांनी भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेच आता समाजाला न्याय देतील, असे वाटत आहे. येत्या काही दिवसात राज ठाकरे यांची भेट घेण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचेही आम्ही मराठा संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध शेलार यांनी सांगितले. तसेच मराठा आरक्षणासाठी ठाकरे यांनी सकारात्मकता दाखविल्यास आपण मनसेसाठी काम करण्याचा विचार करणार आहोत, असेही ते म्हणाले.
बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply