Pimpri News: भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत येणार, त्यांचे आम्ही स्वागत करणार – अजित पवार

Pimpri News: भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत येणार, त्यांचे आम्ही स्वागत करणार – अजित पवार

Pckhabar-पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील भाजप कार्यकर्ते परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार असून आम्ही त्यांचे स्वागत करणार असल्याचे उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे भाजपच्या गोट्यात खळबळ उडाली आहे.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजितदादा म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत येण्याचे ठरविले आहे. त्यांचे आम्ही स्वागत करणार आहोत. यामुळे पिंपरी-चिंचवड शहर भाजपमधील कोणते पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते राष्ट्रवादीत जाणार याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

आता गार-गार वाटतेय!

भाजपमध्ये जाणा-यांना राष्ट्रवादीचे सरकार येणार नाही. भाजपचेच सरकार येईल. असे वाटत होते. त्यामुळे कामाकरता भाजपमध्ये गेले होते. जे कामा करता गेले असतील. त्यांची तिथे कामे झाली नाही. तर ते कामाकरता परत दुसरीकडे जातील असे मी म्हणालो होते. इतर पक्षातील आमदार घेताना भाजपला उकळ्या फुटत होत्या, बरे वाटत होते. आता गार-गार वाटते, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *