Pimpri news: लॉकडाऊन पुन्हा परवडणारे नाही : खासदार बारणे

Pimpri news: लॉकडाऊन पुन्हा परवडणारे नाही : खासदार बारणे
Pckhabar-कोरोना या जागतिक महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाटी सर्वप्रथम महाराष्ट्रात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाऊन जाहिर केले. त्यानंतर देशभर लॉकडाऊन केले. नुकतेच युरोपातील अनेक राष्ट्रांनी पुन्हा लॉकडाऊन केले आहे. परंतू महाराष्ट्राला आता लॉकडाऊन परवडणारे नाही. त्यासाठी आपण सर्वांनी सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे. मास्कचा वापर करा, सॅनिटायझर वापरा, गर्दित जाण्याचे टाळा असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी दिघी येथे केले.
       शिवसेना शाखा दिघी आणि कै. तानाजी सोपानराव वाळके व कै. सुजाता एकनाथ वाळके प्रतिष्ठान व यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दिघी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्‌घाटन खासदार बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राम गावडे,  माथाडी मंडळ सल्लागार समिती सदस्य व कामगार नेते इरफान सय्यद, माजी सरपंच साहेबराव वाळके, माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके, आयोजक संतोष तानाजी वाळके, सारिका संतोष वाळके, पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव आदी उपस्थित होते.

सर्व सहभागी रक्तदात्यास हेल्मेट, पाण्याचा जार, हेडफोन भेट या पैकी एक वस्तू भेट देण्यात आली. दिघी शिवसेना आणि वाळके प्रतिष्ठान तसेच लायन्स क्लब ऑफ पुणे डिजिटल व रेड प्लस रक्तपेढीचे सहकार्याने आयोजित केलेल्या या भव्य रक्तदान शिबीरात 603 रक्तदात्यांनी रक्तदान केले.      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *