Pimpri corona News: पॉझिटिव्ह न्यूज! कोरोनामुळे शहरात आज एकही मृत्यु नाही

Pimpri corona News: पॉझिटिव्ह न्यूज! कोरोनामुळे शहरात आज एकही मृत्यु नाही

90 नवीन रुग्णांची नोंद, 163 जणांना डिस्चार्ज
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहराच्या  विविध भागातील 82 आणि महापालिका हद्दीबाहेरील 8 अशा 90 नवीन रुग्णांची शनिवारी नोंद झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या  163 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, शहरात आज कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही.

शहरात आजपर्यंत 96 हजार 43 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 92 हजार 675 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 1745 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 717 अशा 2462 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 764 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1239 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *