Pimpri corona News: शहरात आज 111 नवीन रुग्णांची नोंद, 121 जणांना डिस्चार्ज, 3 मृत्यू

Pimpri corona News: शहरात आज 111 नवीन रुग्णांची नोंद, 121 जणांना डिस्चार्ज, 3 मृत्यू
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहराच्या  विविध भागातील 111 नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या  121 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजपर्यंत 95 हजार 961 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 92 हजार 512 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1745 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 717 अशा 2462 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 747 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 839 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.  

शहरातील तीन जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात बिजलीनगर येथील 61 वर्षीय पुरुष, काळेवाडीतील 65 वर्षीय पुरुष आणि दिघीतील 48 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *