Bhosari news: संत निरंकारीतर्फे आयोजित शिबिरात 293 जणांचे रक्तदान
Pckhabar- संत निरंकारी मिशन अंतर्गत, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन पुणे झोन,भोसरी ब्रांचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात 293 जणांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन ताराचंद करमचंदानी (पुणे झोन प्रभारी संत निरंकारी मंडळ ,पुणे) यांच्या हस्ते संपन्न झाले. यामध्ये ससून रुग्णालय रक्तपेढी यांनी 139 युनिट, यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढी यांनी 154 युनिट रक्त संकलन केले. शिबिरात प्रशासन-डॉक्टरांनी दिलेल्या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यात आले तसेच सोशल डिस्टंसिंग कडे विशेष लक्ष देण्यात आले.
विशेषतः कोरोना काळामध्ये संत निरंकारी मिशनच्या 170 अनुयायांनी यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये जाऊन ज्याप्रमाणे आवश्यकता भासत होती तसे रक्तदान करून अनेक रुग्णांचे प्राण वाचवले. तसेच वेळोवेळी कोरोनाग्रस्त रुग्णांना प्लाझ्मादान करून माणुसकीचे दर्शन घडवले. मिशनच्या या निस्वार्थ कार्याची रुग्णालय प्रशासनाने प्रशंसा केली.
Bhosari news: संत निरंकारीतर्फे आयोजित शिबिरात 293 जणांचे रक्तदान










Leave a Reply