Dehu BJP news : भारतरत्न, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना देहू भाजपतर्फे अभिवादन
Pckhabar- भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी देहू शहर व देहू ग्रामस्थ यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी देहूचे उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे, मा.पं.स. बाळासाहेब काळोखे, मा. उपसरपंच संतोष हगवणे, मा.जि.प.सदस्य माऊली काळोखे, रो. मा.अध्यक्ष संजय भसे, मा.ग्रा.प सदस्य माहेश मोरे, सागर मुसुडगे, अभि पडोस्कर, सचिन काळोखे, रायबा मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे म्हणाले, ”भारताचे माजी पंतप्रधानअटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी भारतात ‘गुड गवर्नेंस डे’ अर्थात सुशासन दिन साजरा केला जातो. अटल बिहारी वाजपेयी एक प्रतिभासंपन्न असं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी भारताचे नाव अनेक क्षेत्रात मोठे केले आहे”.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदीप परंडवाल यांनी केले. आभार सागर मुसुडगे यांनी मानले.










Leave a Reply