Sports news: बॉक्सिंग डे टेस्टसाठी भारतीय संघ जाहीर
Pckhabar-ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरी बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) साठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वात प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल झाले आहेत. पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) बाहेरचा रास्ता दाखवत त्याच्या जागी शुभमन गिल (Shubman Gill) याला पदार्पणाची संधी मिळाली आहे. शिवाय, दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागी मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) देखील कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे.
विराट कोहली पितृत्व रजेवर असल्याने उपकर्णधार रहाणे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळेल. विकेटकीपर म्हणून रिद्धिमान साहाच्या जागी रिषभ पंतची (Rishabh Pant) संघात निवड झाली आहे. भारताने रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या दोन फिरकीपटूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे.
भारतीय संघ पुढीलप्रमाणे:
मयंक अग्रवाल, अजिंक्य रहाणे (कॅप्टन), चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जसप्रीत बुमराह.










Leave a Reply