Pimpri Corona News: शहरात आज 148 नवीन रुग्णांची नोंद, 98 जणांना डिस्चार्ज, 1 मृत्यू

Pimpri Corona News: शहरात आज 148 नवीन रुग्णांची नोंद, 98 जणांना डिस्चार्ज, 1 मृत्यू

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 148 नवीन रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली आहे. एकाचा मृत्यू झाला असून उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या 98 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजपर्यंत 95 हजार 850 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 92 हजार 391 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1742 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 717 अशा 2459 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 705 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1606 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. शहरातील रावेत येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *