Talegaon Dabhade news: आमदार सुनिल शेळके यांनी घेतला प्रलंबित कामांचा आढावा

Talegaon Dabhade news: आमदार सुनिल शेळके यांनी घेतला प्रलंबित कामांचा आढावा
Pckhabar- तळेगाव दाभाडे शहरातील विविध प्रलंबित विकास कामांची मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी पाहणी करून आढावा घेतला.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सभागृहात आढावा बैठक आयोजित केली होती. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अंतर्गत अनेक विकास कामे प्रलंबित आहेत. विकासकामांना मंजुरी मिळूनही काही कामे अर्धवट स्थितीत आहेत. रस्त्याची कामे रखडली आहेत. मुख्य बाजारपेठ भागात भविष्यातील विचार करत भुमिगत विद्युतवाहिनी टाकण्याची गरज आहे. तळेगाव-चाकण रस्त्याचा रुंदीकरणाचा विचार करता तेथील वीजवाहिन्या स्थलांतरित करण्याचे नियोजन केले पाहिजे. सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. जनतेसमोर अनेक समस्या असताना नगरपरिषद प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे. स्वच्छ पाणीपुरवठा, चांगले रस्ते, कचरामुक्त शहर यांसारख्या मुलभूत आवश्यक बाबी पुरविण्यास नगरपरिषद असमर्थ ठरत आहे. नागरिकांना वेठीस धरून विकासकामांत राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे पुर्णपणे चुकीचे असुन सर्वसामान्य जनतेचा एकही पैसा चुकीच्या मार्गाने जाऊ देणार नाही.

नगरपरिषदेची भव्य व अद्ययावत प्रशासकीय इमारत होणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून नगरपरिषद मुख्य इमारतीच्या निधीस प्रशासकीय मान्यता चार महिन्यापूर्वी मिळालेली आहे. अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने तांत्रिक मंजुरीचा प्रस्ताव पाठविण्यास नगरपरिषदेकडून दिरंगाई झाल्याचे या बैठकीत निदर्शनास आले आहे.
राज्य शासनाकडे विकासकामांचे प्रस्ताव पाठवायचे असल्यास 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, त्या विकासकामांसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा व निधी आणण्याची जबाबदारी माझी राहील, असे यावेळी सांगितले.

या बैठकीस उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, मुख्याधिकारी दिपक झिंजाड, नगरसेवक गणेश काकडे, संतोष भेगडे, अरुण माने, नगरसेविका हेमलता खळदे, संगिता शेळके, मंगल भेगडे, अधिकारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *