Chinchwad news: असंघटीत कामगार काँग्रेसतर्फे उद्या नोकरी महोत्सव
Pckhabar-असंघटीत कामगार काँग्रेसच्या वतीने उद्या (गुरूवार) चिंचवडमध्ये नोकरी महोत्सव घेण्यात येणार आहे. अशी माहिती असंघटीत कामगार काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष सुंदर कांबळे यांनी दिली आहे.
चिंचवड मधिल प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी अकरा वाजता माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन जोशी यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र असंघटीत कामगार काँग्रेसचे अध्यक्ष मोहम्मद बद्रुजम्मा साहेब, अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र समन्वयक शिवाजीराव जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. या नोकरी महोत्सवात पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवाराच्या मुलाखती घेणार आहेत. यामध्ये कंम्पास ग्रुप, फिनोलेक्स केबल, भारत पे, मॅजिक बस, बजाज टो कंपनी, सोडेक्सो, ग्लोबल इनोसोर्स, एसबीआय बँक क्रेडीट कार्ड, डि मार्ट, ब्रिटानी कंपनी, एलआयसी, एमपीटीएल बारामती, जपान आदी कंपन्यांमध्ये रिसेप्शनिस्ट, आयटी सेंटर, मेडीकल, कॉल सेंटर, डिलीव्हरी बॉय, मार्केटिंग आदी पदांसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. पाचवी पास ते व्दिपदवीधर पर्यंतच्या स्त्री, पुरुष उमेदवारांसाठी या मुलाखती होतील. इच्छुकांनी आपल्या बोयोडेटा आणि शैक्षणिक पात्रतेच्या झेरॉक्स प्रतीसह सकाळी 10 वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक व असंघटीत कामगार काँग्रेसचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष सुंदर कांबळे यांनी केले आहे. आवश्यकता असल्यास इच्छुकांनी 9764396152 या क्रमांकावर आपला बायोडेटा व्हॉटसअप सेंड करावा.
Chinchwad news: असंघटीत कामगार काँग्रेसतर्फे उद्या नोकरी महोत्सव










Leave a Reply