Pimpri news: पिंपरीतील पुलाचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते करा
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पवना नदीवर उभारण्यात येणार्या पिंपरी गाव व पिंपळे सौदागर गावांना जोडणारा समांतर पुलाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करावे अशी आग्रही मागणी पिंपरी गावच्या नगरसेविका उषा वाघेरे यांनी मागणी महापौर उषा ढोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पिंपरीगाव, रहाटणी, काळेवाडी, पिंपरी कॅम्प भागातील नागरिकांना या पुलामुळे वाहतुकीचा प्रश्न निकाली निघणार आहे. शहराच्या विकासात व जडणघडणीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. शहराचे विकासपुरुष म्हणून अजितदादा यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्या हस्ते पिंपरीगाव व पिंपळे सौदागर परिसराला जोडणार्या समांतर पुलाचे उदघाटन व्हावे असे अशी शहरातील रहिवाशांची इच्छा आहे. त्यामुळे पालकमंत्री अजित पवार यांंची वेळ घेऊन भूमिपूजन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात यावे असे मागणी वाघेरेे यांनी केली आहे.
Pimpri news: पिंपरीतील पुलाचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते करा










Leave a Reply