Talegaon Dabhade news:
जनरल मोटर्समधील कामगारांना ग्रेट वॉल मोटर्समध्ये समाविष्ट करा
Pckhabar-तळेगाव औद्योगिक पट्यातील जनरल मोटर्स इंडिया कंपनी बंद करण्यापूर्वी सर्व कामगारांना ग्रेट वॉल मोटर्स या कंपनीमध्ये कायमस्वरूपी समाविष्ट करून घ्यावे. या कामगारांच्या प्रश्नासाठी लक्ष घालावे, अशी विनंती माजी मंत्री बाळा भेगडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे.
मावळ तालुक्यातील ॲटोमोबाइल क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाची जनरल मोटर्स इंडिया कंपनी चीनच्या द ग्रेट वॉल या कंपनीला विकण्यात आली आहे. त्यामध्ये मावळ तालुक्यासह राज्यातील अनेक भागातून आलेला कामगार वर्ग या कंपनीत काम करत आहे. 1578 कामगार कायमस्वरूपी व 2000 कामगार हे काँट्रॅकट मध्ये काम करत आहेत.
कंपनी बंद होणार असल्याने 3578 कामगार बेरोजगार होणार आहेत.
या सर्व कामगारांना लवकरात लवकर न्याय मिळावा या करीता माजी मंत्री बाळा भेगडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हि बाब निदर्शनास आणून दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून जातीने लक्ष घालून कामगारांना न्याय द्यावा, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांन पत्र पाठविले आहे.










Leave a Reply